महिला किसान योजना Mahila Kisan Yojana
महिला किसान योजना
🧐 महिला किसान योजना
⚡ अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास (एन.एस.एफ.डी.सी) महामंडळामार्फत योजना राबविली जाते.
🤔 योजनेच्या प्रमुख अटी :
• अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
• अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
• अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावे.
• अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
(अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98000 रुपये व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत असावे.
• (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असावे.
• जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
• अर्जदाराने या महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक असतील.
📄 आवश्यक कागदपत्रे :
✔ अर्जदाराचा जातीचा दाखला.
✔ अर्जदाराचा रहिवाशी दाखला.
✔ अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
✔ शेत जमिनीचा 7/ 12 उतारा
💰 लाभाचे स्वरूप असे : योजनेंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा 7/ 12 उतारा आहे किंवा पतिपत्नी दोघांच्या नावे 7/12 उतारा आहे, तसेच पतीच्या नावे 7/12 उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्राद्वारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीला 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये 10 हजार रुपये अनुदान व उर्वरित 40 हजार रुपये कर्ज स्वरुपात 5 टक्के व्याज दराने मंजूर केले जाते. हे कर्ज फक्त शेतीसाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठीच दिले जाते.
🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ जिल्हा कार्यालय.
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
टिप्पणी पोस्ट करा