जेंव्हा लोक तुमची निंदा करतात तेंव्हा फक्त हे एकच काम करा, तुम्हाला त्रास होणार नाही !

Just do this one thing when people criticize you, you won't be bothered!
जेंव्हा लोक तुमची निंदा करतात तेंव्हा फक्त हे एकच काम करा, तुम्हाला त्रास होणार नाही !


मित्रांनो जेंव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतात, तुमची निंदा करतात तेंव्हा नक्की काय करायचे? किंवा अश्या लोकांना नक्की सामोरे कसे जायचे याचे उत्तर आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाद्वारे बघणार आहोत. तुकाराम महाराजांना अश्या लोकांबद्दल नक्की काय बोलायचे आहे ते एका गोष्टी द्वारे बघूया. एकदा एक सेल्समन आपल्या घरातून बाहेर पडताना देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा आज जेवढे लोक मला नाव ठेवणारे आहेत, माझी निंदा करणारे आहेत, तेवढे सगळे मला भेटले पाहिजे.

मागून त्याची बायको म्हणते आहो ती काय अशी प्रार्थना करताय? आज तुमची महत्त्वाची मिटिंग आहे. आज एक मोठे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे, आणि हे काय तुम्ही देवाकडे मागताय? तो त्याच्या बायकोला म्हणतो, काही होत नाही गं, आज येऊदे सगळ्यांना. मग तो सेल्समन आपल्या सोसायटीमधून चाललेला असतो तेंव्हा सोसायटीमधला एक माणूस त्याला बघून म्हणतो हा बघा आपल्या सोसायटीचा सेक्रेटरी, मी आधीच सांगितले होते ह्याला सेक्रेटरी बनवू नका. हा कुठल्या अंगाने सेक्रेटरी शोभतो का तरी? ह्याची बूट नेहमी धुळीने माकलेली असतात. ह्याला धड टाय नीट बांधता येत नाही. ह्याला कोणी सेक्रेटरी बनवले काय माहिती?

तो सेल्समन त्याच्यावर चिढण्याऐवजी एक छानसे स्मित हस्य देतो आणि निघून जातो. ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर त्याला त्याची निंदा करणारा एक सहकारी भेटतो, तो म्हणतो बघा साहेबांनी कॉन्ट्रॅक्टसाठी कोणाची निवड केली ह्याच्या शरीरातून तर नेहमी घामाचा वास येतो आणि हा तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन येणार? इथे पण तो सेल्समन त्याच्यावर चिढण्याऐवजी एक छानसे स्मित हास्य देऊन कॉफी घ्यायला जातो. जेंव्हा तो कॉफी घेत असतो तेंव्हा त्याला तिथे त्याचा जुना बॉस भेटतो, तो त्याला म्हणतो तुला सांगितले होते डिपार्टमेंट बदलू नको साधी आकडेवारी तुझ्या लक्षात राहत नाही आणि क्लायंटकडे जाऊन तू काय प्रेझेंटेशन देणार?

तो सेल्समन परत हसतो आणि पुढे निघून जातो. असे त्याला अजून नावे ठेवणारे, त्याची निंदा करणारे भेटतात. तो त्या सगळ्यांचे ऐकतो आणि त्यांनाही एक छान स्मित हास्य देतो. आता तो सेल्समन आपल्या जागेवर येऊन बसतो. त्या महत्त्वाच्या मिटींगला जाण्याआधी त्याची निंदा करणाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी आठवतो, आपल्या बुटांना व्यवस्थित पॉलिश करतो, टायची गाठ एकदम व्यवस्थित बांधतो, शरीरातून वास येऊ नये म्हणून अंगाला डिओ परफ्युम लावतो, प्रेझेंटेशनची तयारी करताना तो आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतो आणि बाकी सगळ्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतो.

आता तो सेल्समन मिटिंगसाठी पूर्ण तयार असतो आणि साहजिकच आहे एवढ्या सगळ्या तयारी नंतर त्याचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा साईन होते. मित्रांनो मुद्दा हा आहे आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये अशी अनेक लोक भेटतात जी आपल्याला कमी लेखतात, आपल्याला नाव ठेवतात, आपली निंदा करतात, आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. जेंव्हा आपण आयुष्यामध्ये पुढे जातो काहीतरी चांगले करतो, प्रगती करतो तेंव्हा आपल्याला पाय खेचणारे तर मिळणारच.

जेंव्हा अशी लोक तुम्हाला भेटायला सुरुवात होते तेंव्हा समजून जा की तुम्ही प्रगतिपथावर आहात, पण आपण अश्या लोकांमुळे थांबायचे नाहीये. उलट त्यांच्या बोलण्याचा फायदा घेऊन आपण पुढे जायचे आहे. कधी कधी आपल्याला नाव ठेवणारे, आपली निंदा करणारे आपल्याला अशे धडे शिकवून जातात की आपल्या जवळचे सुद्धा ते देणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, "निंदकाचे घर असावे शेजारी" माझ्या शेजरी जर माझ्या निंदकाचे घर असेल तर माझ्या आयुष्यात सुधारणा होणार हे नक्की कारण माझ्या वाईट सवयी मला कधीच दिसत नाहीत.

म्हणून पुढच्या वेळेस जर तुमच्यावर कोणी टीका केली, तुम्हाला नाव ठेवले तर त्याच्याकडे बघून एक स्मित हास्य द्या. त्याच्या बोलण्यातून तुम्हाला काही फायदा होत असेल तर तो फायदा करून घ्या नाहीतर सरळ दुर्लक्ष करा आणि आपले ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहा. तुमचा राग करणारे, द्वेष करणारे तिथेच राहतील पण तुम्ही तुमचा फायदा करून पुढे जाल. मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला कितीही कोणी नावे ठेवली, तुमच्यावर टीका केली जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.

Source - marathiviralstory


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!