1 कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...

एक कोटी रुपये पगाराची नोकरी सोडून UPSC चा अभ्यास सुरु केला आणि...


UPSC च्या परीक्षेतून देशाची सेवा करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. त्यासाठी देशातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थी, तरुण प्रयत्नशील असतात. एक चांगलं करिअर, प्रतिष्ठा आणि देशाची सेवा म्हणून UPSC कडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. यामध्ये असेही काही असतात जे देशाच्या सेवेसाठी मोठी पगाराची नोकरी सोडून येतात. कनिष्क कटारिया हेसुद्धा त्यातलंच एक नाव. आयएएस अधिकारी होण्याआधी त्यांनी दक्षिण कोरियामध्ये एक कोटी रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली. भारतात परतल्यावर UPSC चा अभ्यास सुरु केला. पहिल्याच प्रयत्नात कनिष्कने 2018 मध्ये UPSC मध्ये यश मिळवलं आणि तो टॉपरही बनला.

राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणारा कनिष्क हा दहावी बारावीतसुद्धा 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्यानंतर आयआयटीमध्ये 44 वी Rank मिळवली होती. Bombay IIT मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला South Korea मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण कनिष्कला फक्त पैसे कमवायचे नव्हते. त्याला IAS अधिकारी होऊन समाजातील गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी काम करायचं होतं. 

घरचं वातावरण अभ्यासाचं आणि सिव्हिल सर्विसचं असल्यानं कनिष्कला UPSC मध्ये मदत झाली. त्याचे वडिल आणि काका दोघेही IAS अधिकारी होते. त्यांच्याकडूनच कनिष्कला ही प्रेरणा मिळाली. दक्षिण कोरियातून भारतात आल्यावर त्यानं तात्पुरती एक नोकरीसुद्धा केली. मात्र त्याचे लक्ष आयएएस होण्याकडे होते. 

UPSC  तयारीसाठी कनिष्कने दिल्लीत क्लासही लावले. परीक्षेचा पॅटर्न समजण्यासाठी आणि गणिताची तयारी करण्यासाठी क्लास लावावे लागले असं तो म्हणतो. याशिवाय सेल्फ स्टडीसुद्धा महत्वाचा ठरला. दबाव न घेता एक आव्हान म्हणून UPSC कडे पाहिले. तसंच हे सर्व करताना छंदही जोपासले असंही कनिष्क म्हणतो.

छंद जोपासल्याने त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. दररोज जवळपास दहा तास अध्यास करून आणि वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स काढल्यानं थोडं सोपं गेलं. हल्ली Distraction due to social media होतं असं म्हणतात पण अभ्यास करताना सोशल मीडियावरून दूर नव्हतो. यातूनही अनेक अपडेट मिळायचे. मित्रांशी संपर्क करून Nots Share करता यायच्या असं कनिष्क म्हणतो.

Source marathiviralstory



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!