खाजगी २४ डॉक्टरांकडून कोवीड रुग्णांची विनामुल्य सेवा
👉 अंबाजोगाई शहर आणि परिसरातील गावात वाढत जाणारी कोवीड रुग्णसंख्या लक्षात घेवून शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर संघटनेने पुढाकार घेतला आहे.
👉 या संघटनेचे २४ डॉक्टर शहरातील विविध विलगीकरण कक्षात जावून स्वच्छेने मोफत रुग्ण सेवा देत आहेत.
👉 बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे मोफत रुग्ण सेवा देणारे अंबाजोगाई हे एकमेव शहर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
👉 अंबाजोगाई शहर आणि परिसरात कोवीड पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.
👉 या रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची एक व्यापक बैठक जिल्हाधिकारी याहुल रेखावार यांनी घेवून विलगीकरण कक्षातील कोवीड रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले होते.
टिप्पणी पोस्ट करा