शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर थेट बांधावर
बीड बातम्या : परतीच्या पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अन त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजीमंत्रि जयदत्त क्षीरसागर आज बीड विधानसभा मतदार संघातील काही गावाच्या भेटीला गेले होते, थेट बांधावर जाऊन त्यांनी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी ची पाहणी करून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत, शेतकऱ्यांना धीर दिला
यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडवून देत बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम उध्वस्त केला, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे , आज माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदार संघातील रायमोहा सर्कल मधील रायमोहा, डिसलेवाडी, तागड गाव , आनंदवाडी ,बाभूळ खुंटा,जरूड फाटा,सह काही गावाना भेटी देत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेतल्या, उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत
हे महा आघाडी चे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे सरकार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुमचे अश्रू अन तुमच्या भावनांची कदर आहे, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, धीर सोडू नका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आहेत, शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम हे सरकार नक्की करेल अशा आशावाद व्यक्त केला, निसर्गाच्या अवकृपेने परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे, खरीप हंगाम उद्धवस्त झाला आहे, कापूस , तूर , सोयाबीन , बाजरी पिके नेस्तनाबूत झाली आहेत, शेतकरी खचू नये त्यासाठी शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे असा विश्वास शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा