शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली का? नेमकं काय म्हणाले पवार,वाचा

Home page


आज राष्ट्रवादीचे शरद पवार [Sharad Pawar] यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस [Corona vaccine] घेतल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार [Sharad Pawar]  बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा रंगली होती. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार  [Sharad Pawar]  यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी ते म्हणाले की, मी सिरममध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी कोरोनाची लस [Corona vaccine] घेतलेली नाही. सिरममध्ये जाऊन मी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची लस घेतली. मी इम्युनिटी वाढविण्याची लस घेतल्याचे यावेळी पवारांनी सांगितले. त्यामुळे मी कोरोनाची लस घेतल्याचे लोक म्हणतात ते खरं नाही. त्याशिवाय माझ्या स्टाफनेही ही लस घेतल्याचे पवारांनी स्पष्ट केलं.


पवार हे कोरोना लशीची निर्मिती करणा-या सिरममध्ये एकदा नाही तर दोन वेळा गेल्यामुळे उत्सुकता वाढली होती. मात्र त्यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. पवार म्हणाले की, मी एकदा नाही तर दोन वेळा लस घेतली. मात्र जी तुम्हाला आणि लोकांना वाटते ती कोरोनाची लस नाही. तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची. मी इतकं लोकांमध्ये फिरतो..मिसळतो…प्रतिकारशक्ती वाढायला हवी म्हणून मी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतल्याचे ते म्हणाले.
कृषी विधेयकावर टीका

याशिवाय शरद पवारांनी [Sharad Pawar]  केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने नुकतेच जे कृषी विषयकाबाबत निर्णय घेतले त्याबद्दल आमची नाराज आहोत. लोकांनाही ते विधेयक न पटल्याने पंजाब-हरयाणा येथील लोक रस्त्यावर आले आहेत.


हाथरस प्रकरणी नाराजी

उत्तर प्रदेशातील हाथरस [Hathras in Uttar Pradesh] येथे पीडित मुलीच्या अंत्यसंस्काराला तिच्या नातेवाईकांनी उपस्थित राहू न दिल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशी घटना देशात कधीच घडली नसल्याचे ते यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला, टोकाची भूमिका घेतली, कायद्याला कवडीची किंमत दिली नाही.


पवारांनी पार्थला पुन्हा फटकारले

मराठा आरक्षणाच्या [Maratha reservation] प्रश्नावर पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार [NCP President Sharad Pawar]  यांनी पुन्हा एकदा पार्थ यांचे नाव न घेतला फटकारले आहे. या प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. स्थगिती उठावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादीची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. पवार पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवणे हे गरजेचं आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. आत्महत्या करणं योग्य नाही.




आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!