🗞️ जिल्हानिहाय ठळक घडामोडी - Beed highlight News

  • मागील अनेक वर्षापासून अखंडित सेवा देऊनही शासनाकडून नियमित सेवात समावेशन केले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी डॉक्टरांची काळ्या फिती लावून आंदोलन
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी बाजार समिती परिसरात स्वयंचलित निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ
  • आष्टीतील धस धोंडे या:चे स्वतंत्र कार्यक्रमाने भाजपातील गटबाजीचे दर्शन. खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी आ. धस यांच्या कार्यक्रमाकडे फिरवली पाठ...
  • ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यातील निकृष्ट बांधकामाची चौकशी करून पुनर्बांधणी करण्याची किल्लेधारुर युथ क्लबची मागणी.
  • बीड जिल्हा आणि संकट इथल्या बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या निसर्गाच्या लहरीपणामुळे इथल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
  • स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही गावाला रस्ता नाही गरोदर महिलेस रुग्णालय गाठण्यासाठी पायी चालावे लागले, बैलगाडीत बसावे लागले
  • यावर्षी जानेवारी ते 14 ऑगस्टपर्यंत तब्बल 135 शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जाचा बोजा यामुळे आत्महत्या केल्या असून यापैकी केवळ 54 शेतकरी शासनाच्या मदतीस पात्र ठरल्या असून 25 शेतकरी अपात्र ठरले आहेत.
  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यापासून आठवडी बाजार बंद केलेले होते. रात्री आठवडी बाजारावरील बंदी उठवण्यात आली असून आजपासून बाजार भरण्यास सुरुवात झाली.