तेलगाव नाक्यात 3 दिवसांपासून बत्ती गूल
शहरातील तेलगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने त्या परिसरातील नागरिकांचे आतोनात हाल होत असून त्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी या संबंधी महावितरण कंपनीच्या उपलब्ध अधिकार्यांकडे माहिती देण्यासाठी प्रयत्न केले असता अनेक कर्मचार्यांचे मोबाईल नंबर बंद आले. तसेच संबंधितांना विचारणा केली असता सबस्टेशनमधील एक खुंटी तुटली असल्याची माहिती मिळाली असून इतर सबस्टेशनमधून पुरवठा घेतल्यानंतर ओव्हरलोड होत असल्याने त्या लाईनचाही विज पुरवठा तात्काळ खंडीत होत आहे.
अशा प्रकारे त्या परिसरातील नागरिकांचे हाल होत असून या संबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हॉटस्ऍपद्वारे माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी व्हॉटस्ऍप मॅसेजवर लक्ष दिले असून लवकरच त्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. शहरातील तेलगाव नाका परिसरातील गांधीनगर, हजरत शहेंशाहनगर, अख्तरनगर, दिलावर नगर, नूर कॉलनी, नाळवंडी नाका, हुसैनिया कॉलनी यासह त्या परिसरातील अनेक भाग गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत.
याची माहिती महावितरण कंपनीला मिळाल्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून दुरुस्तीच्या कामाचा शोध घेत असून गेल्या तीन दिवसांपासून लाईट बंद असल्याचे मुख्य कारण काय? हे त्या कर्मचार्यांनाही समजले नसल्याचे समजले असून या परिसरात तात्काळ विद्युतपुरवठा सुरळीत करावा, यासाठी त्या परिसरातील समाजसेवकही सरसावले आहेत. परंतु दुरुस्त काय करायचे हेच महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांना कळत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून या लोकांना अंधारात आपली उपजिविका भागविण्याची वेळ आली आहे.
| |||||||
टिप्पणी पोस्ट करा