जोपर्यंत लस नाही, तोपर्यंत लढाई सुरूच; पंतप्रधान मोदी

💥 जोपर्यंत लस नाही, तोपर्यंत लढाई सुरूच; पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

💫 देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 


💁‍♂️ पंतप्रधान म्हणाले :

▪️ कोरोना गेला अशी समजूत करण्याची किंवा कोरोनापासून धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही, 


▪️ भारतानं जास्तीत जास्त लोकांचं जीवन वाचवलं, 90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध, 12 हजार क्वारंटाईन सेंटर, 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु 


▪️ भारतात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यूदर 83 आहे, अमेरिका, ब्राझिल, ब्रिटनसारख्या देशात 600 पार आहे.


▪️ आज आपल्या देशात करोना रुग्णांसाठी 90 लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. 12 हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. 


📌 देशभरातील कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.