कुठे थांबायचं.....?
जन्माला आल्या पासून ते मोठ होईपर्यंत आपल्या आयुष्याचा प्रवास हा भरधाव वेगाने सुरु असतो..... प्रत्येक जण आपल्या आयुष्यात धावत असतो.... धावता नाही जमलं तर जोरात चालत असतो.... ते ही नाही जमलं तर नुसतंच चालण्याचा प्रयत्न करत असतो...... हे सगळंच अविरत सुरु असत का तर प्रत्येकाला स्वतः च आयुष्य सुखकर करायचं असत..... प्रत्येकाचीच स्वप्न असतात प्रत्येक जण त्याचा पाठलाग आपापल्या परीने आपापल्या क्षमतेचि स्वतःच्या परिस्तिथीशी सांगड घालून करत च असतो......
पण आपण आयुष्यात इतके का सतत धावतोय..? नक्की आपल्याला काय मिळावायाचं आहे..? आणि ज्याच्या साठी धावून जे मिळतंय ते खरच आपल्या मनाला समाधान देणार आहे का..? की फक्त लोकांच्या नजरेत आपण किती छान आहोत ह्याचा दिखावा कारण्यासाठी हा सगळा खटाटोप आपण आपल्या आयुष्यात मांडलेला असतो...... ह्याचा खरच आपण विचार करतो का..? तर उत्तर मिळेल नाही..... कारण फार कमी लोक आहेत जी खरच हा विचार करतात आणि म्हणूनच ती त्यांच्या आयुष्यात खूप काही मिळवून जातात.....
खरं तर उगाचच प्रवाहासोबत धावल्याने आपल्याला मिळत तर काहीच नाही..... फक्त आपण गमावून बसतो ती म्हणजे स्वतः ची "ओळख".... सगळे करतात म्हणून मी ही करेन ह्या विचारातच मोठी गल्लत आहे..... सगळ्यांसारखच जगायचं असेल तर मग आयुष्याचा इतका आटापिटा करायचा तरी कशाला..... इतकी मेहनत घ्यायची तरी कशाला.... न मेहनत घेता ही इतरांसारखं जगता येत की..... इतरांच्या जगण्या - वागण्याची हुबेहूब नक्कल केली की सहज सोपं आयुष्य जगता येत..... पण खरच त्यात मजा आहे का......?
आपण काय करतोय..? कशा साठी करतोय..? त्यातून काय मिळणार..? काय साध्य होणार..? हे आपल्याला काही वेळा कळतच नसतं..... आपण आपल्या मनाशी एक ध्येय ठरवलेलं असत आणि ते साध्य करण्यासाठी फक्त धावत असतो.....काही काळानंतर मागे वळून पाहतो तेंव्हा कदाचित ज्या ध्येयासाठी संपूर्ण आयुष्य आपण घालवलेल असत ते आपण मिळवलेल ही नसतं..... पण त्या नादात आपण आपलं जगणं नक्कीच गमावलेल असत......
सांगायचा मुद्धा हाच की खूप धावता धावता आपल्याला "थांबायच" ही असत हे मोठ झाल्यावर आयुष्याच्या धकाधकित आपण विसरूनच गेलेलो असतो..... हमखास त्याचा आपल्याला विसर पडत असतो.....ह्या पेक्षा आपण बालपणी खूप हुशार असतो कारण आपण आपल बालपण आठवल तर लक्षात येईल की तेंव्हा... आपण रांगतो.... चालतो.... पळतो.... पण तेंव्हा आपण स्वतः च " थांबणं "हे ही शिकतो..... आपल्याला कोणी सांगायला येत नाही अरे बाबा ह्या इतर गोष्टींसारखंच " थांबणं " हे ही तितकंच महत्वाचं आहे .... तू इथे थांबायला हवंस.... हे आपल्या स्वतःलाच कळत असत.....मग मोठं झाल्या वर ही गोष्ट आपल्या कडून कशी काय राहून जाते....?
आयुष्यात खूप गोष्टी आपण करत असतो.... कधी कधी करायचं असत एक आणि होतं भलतंच.... कधी कधी खूप इच्छा असून त्यासाठी मेहनत करून ही मार्ग मिळत नसतो...... किंवा मार्ग मिळालेला ही असतो असं आपल्याला वाटतं असत पण तो आपल्या ध्येया कडे पोहोचवत नसतो..... तेंव्हा नक्कीच आपल्याला " कुठे थांबायचं" हे कळायला हवं आणि मार्ग बदलून पुन्हा नव्या उमेदिने प्रयत्न करायला हवा....
" जो थांबला तो संपला ".....हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण एखाद्या ठिकाणी थांबून आपण केलेल्या चुकांचा आणि चुकीच्या निर्णयाचा विचार करून त्याना आयुष्यभर कुरवाळत न बसता..... एकदा स्वतः साठी थांबून ....स्वतः ला वेळ देऊन..... दोन पाऊल मागे जाऊन पुन्हा उंच उडी मारण्यातला जो आनंद आहे तो खरच कुठेच शोधून सापडणार नाही...... ज्या क्षणाला इतरांसाठी आपण थांबलेलो असतो अगदी संपलेलो असतो..... तीच खरी वेळ असते
स्वतः साठी थांबून योग्य विचार करून भविष्यातील योग्य निर्णय घेउन आपल्या ध्येया कडे वाटचाल करण्याची......
आयुष्यात "कुठे थांबायचं" हे कळणं फार गरजेचं आहे एवढं नक्की नाहीतर नक्कीच गफलत होते.....
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येक वेळी उगाचच धावायची गरज नसतेच मुळात " कुठे थांबायचं " हे कळलं की आपोआप आयुष्य बदलत........
© निलेश रमेश जाधव.
टिप्पणी पोस्ट करा