पायजमा घालून घरात बसून ही कंपनी देणार 28000 रुपये



पायजमा घालून आरामात घरी सोफ्यावर बसून किंवा लोळत वेबसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला मानधन मिळू शकतं. जगात कुठेही बसून काम केलंत तरी तुम्हाला ही नोकरीची ऑफर आहे. आरामदायी कपड्यांचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला 300 युरोंचं म्हणजेच  सुमारे 28 हजार 515 रुपयांचं मानधन मिळेल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घरातून पाऊलही बाहेर टाकावं लागणार नाही.

हे स्वप्न नसून सत्य आहे, Britain मधील पॉर मोई Pour Moi या कपड्यांच्या कंपनीने ही आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिवसभर घरात पायजमा घालून निवांत सोफ्यावर बसून Netflix च्या वेबसीरिजचा आनंद लुटायचा आणि या कंपनीचे घरात वापरायचे कपडे वापरून कसं वाटलं हे त्यांना सागायचं. या कामासाठी तुम्हाला पैसे देण्याची घोषणा या कंपनीने केली आहे. सध्या अनेक लोक घरूनच काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणं हा सर्वांत महत्त्वाचा उपाय मानला जात असल्याने ही संकल्पना राबवली जात आहे. अशाच काळात केवळ टीव्ही पाहण्याचे पैसे तुम्हाला कुणी दिले तर किती चांगलं होईल असा विचार तुमच्या मनात येऊन गेलाच असेल. तेच ही कंपनी करते आहे.

घरी बसून कपड्यांच्या परीक्षणाच्या या नोकरीसाठी तुम्ही 12 October पर्यंत अर्ज करू शकता. Comfy clothing tester अशी ही पोस्ट आहे. जर यासाठी तुम्ही अर्ज करण्याच्या विचारात असाल तर कंपनीनी याबाबत असंख्य नियम दिलेले आहे. या ब्रँडने जाहिरातीत अगदी छोट्या फाँटमध्ये हे असंख्य नियम लिहिले आहेत़.  जर तुम्ही यात भाग्यवान उमेदवार ठरलात तर तुम्ही तुमच्या सोफा किंवा बेडवर बसून आपल्या आवडत्या टीव्ही शोचे 3 एपिसोड पहावे, यासह वाईनचा किंवा हॉट चॉकलेटचा आनंद घ्यावा,  एक कप चहा किंवा हॉट ड्रिंक्सचा आनंद घ्या आणि किमान 10 मिनिटं सोशल मीडियावर फेरफटका मारा या गोष्टी तुम्ही करू शकाल असं या जाहिरातीत म्हटलं आहे.

या Job साठी निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 10  तासांसाठी पॉर मोईचे कपडे घालावे लागतील, आणि 28 हजारांची रक्कम मिळवण्यासाठी ते कपडे वापरण्याचा अनुभव कसा होता याचा एक रिपोर्ट तुम्हाला द्यावा लागेल. यासह निवड झालेल्या उमेदवारांना दिवसातून अनेकदा आपला पोषाख बदलवा लागणार आहे. जेणेकरून पॉर मोईने दिलेल्या कपड्यांचे परीक्षण करता येईल. हे कपडे तुम्ही स्वत:जवळच ठेवू शकता.

हे कपडे वापरल्याचे फोटो  Social Media वर टाका अशी अट यामध्ये नाही.  वयाची 18 वर्ष पूर्ण केलेलं कुणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतं. 12 October पर्यंत नोंदणी करता येणार असून, 26 October ला निवडलेली नावं जाहीर केली जातील.