ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखान्याला कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव

ustod kamgar beed


माजलगाव : ऊसतोडणी कामगारांना (Sugarcane Workers Beed) तोडणीदर 400 रुपये करा, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा अशी मागणी सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या (Sugarcane Workers Union) वतीने मोहन जाधव आणि अशोक (आबा) राठोड यांनी केली आहे.शासन जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत कामगार कारखान्यावर जाणार नाही, ऊसतोडणी कामगारांना मागील पाच वर्षातल्या अंतरिम वाढीसह तोडणीदर 400 रुपये करुन वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. (lokprashna news paper beed)

हेही वाचा लॉकडाऊनमध्येही अंबानींनी तासाला कमावले 90 कोटी!

 कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. उसतोड कामगारांच्या विम्याचा प्रश्न (Ustod workers insurance), मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, दरवाढीचा करार दर तीन वर्षानीच करण्यात यावा. स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी अन्यथा एकही  उसतोडणी कामगार कारखाण्यावर जाणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा अशा मागण्या सीटू ऊसतोड कामगार संघटनेने मांडल्या (Situ Ustod Workers Union).

हेही वाचा  अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. अनंत शिनगारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान