कविता - हास्य Created By प्रमोद आडे

 कविता - हास्य  Credit By  प्रमोद आडे



सहजा सहजी मिळतं नाही 

मिळालं तर घेता येत नाही 

घेतलं तर त्याला घेऊन जगता येत नाही 

चेहऱ्यावर ठेऊन जगलात तर,

आयुष्यात कधी अडचण येतं नाही

असं हे हास्य असतं ओ साहेब ||


पैशाने तर शक्यचं नाही

केंव्हा चेहऱ्यावर येईल,

केंव्हा निघून जाईल

हे सांगून येत नाही 

असं हे हास्य असतं ओ साहेब ||


जेंच्या चेहऱ्यावर असतो,

प्रत्येक क्षणी

तोच असेल श्रीमंताचा धनी

गरीब त्याला विसरत नाही 

म्हणून तो त्यांना सोडत नाही

असं हे हास्य असतं ओ साहेब ||


जो पैश्यांच्या मागे पळतो 

त्याला कधी मिळत नाही

गरीबाला मिळत म्हणून 

तो कधी रडत नाही 

असं हे गरीबांच हास्य असतं ओ साहेब ||


पोटातील आग श्र्वासाने विझवावी लागते

अंगावर गरीबी झेलावी लागते 

मोठ्या लोकांचं बोलणं खपवावं लागतं

आणि दुःख सावराव लागतं

त्यावेळेस हे हास्य मिळतं ओ साहेब ||

     

                                                 - प्रमोद आडे

                                         मो. 7498487474


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!