मुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी Vaidyanath got tired due to Chief Minister Sharad Pawar


 

मुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी


मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 10 कोटी 77 लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. 


कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.


Vaidyanath got tired due to Chief Minister Sharad Pawar

The state government has sanctioned Rs 10 crore 77 lakh to the Vaidyanath Co-operative Sugar Factory due to its timely follow-up to the Chief Minister, Co-operation Minister, senior leader Sharad Pawar and the Sugar Factory Association, said Pankajatai Munde At the cabinet meeting, the government decided to sanction 32 sugar mills in the state.

The list of factories had already been announced, including the Vaidyanath factory. Pankajatai Munde thanked the Chief Minister Uddhav Thackeray, Senior Leader Sharad Pawar, Co-operation Minister Balasaheb Patil and the Sugar Factories Association for following up on the factory. Are considered.