Nagpur Breaking News ऑनलाइन सुरू होता Sex Rocket ; पोलिसांची सापळा रचून तरुणींची केली सुटका



नागपूर - ऑनलाईन [Online Sex Rocket] पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली असून परराज्यातील दोन युवतींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. [Nagpur Online Sex Rocket] 

लॉकडाऊनच्या काळापासून एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने  देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने पोलिसांंनी त्यांचा शोध घेणं अवघड जात होते. मात्र अखेर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांनी वेळोवेळी याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. [Online Sex Rocket]

हा व्यवसाय नागपूरातील मनीष नगर भागात सुरू होता. आरोपी हातातून निसटू नये यासाठी पोलिसांनी सापळा रचना. त्यानंतर पूर्ण तयारीनिशी ते काम करीत असलेल्या भागात धाड टाकली. त्यानंतर व्यवसाय चालविणारे दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. परराज्यातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. अद्याप या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. [Online Sex Rocket]

देशात अशा प्रकारे तरुणींची फसवणूक केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. लॉकडाऊनमध्ये क्राइमचं प्रमाण कमी झालं असलं तरी ऑनलाईन चोरी, सायबर क्राइम याचा पेव फुटलं आहे. त्यामुळे ऑनलाइन काम करताना वा कोणत्याही साइटवर सर्फिंग करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. [Online Sex Rocket]