घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे - Don't be afraid..the animal roaming in the field is not an alien
घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे
शेर करा सर्व मित्रांना
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक खोटी पोस्ट सध्या खानदेशात व्हायरल होत आहे. कुठलीही खातरजमा न करता ती पुढे फॉरवर्ड केली जात आहे. गुजरात सीमेवरून हा एलियनटाईप प्राणी शेतात शिरत असल्याचेही काही पोस्टमध्ये म्हटले आहे. अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, धुळे जिल्ह्यात असा कोणत्याही प्रकारचा प्राणी आढळून आला नसल्याचे तेथे तपास केल्यानंतर सत्य समोर आले आहे.
फोटोत पाहून वाटतेय भीती
मानवासारखा चेहरा, धारधार नखे, घुशीसारखी शेपूट असलेल्या या कथित प्राण्याचे फोटो शेअर केले जात आहेत. यासोबत नखाचे शरीरावर वार होवून रक्तभंबाळ झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो देखील शेअर केले जात आहे. सोबतच शेतकऱ्यांना एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले पोस्टद्वारे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. प्रत्यक्षात ही तद्दन खोटी पोस्ट आहे. कुणीतरी हा खोडसाळपणा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जखमी शेतकरी गुजरातमधील
फेक पोस्टमध्ये जखमी पुरुष व स्त्री यांचे जे फोटो आहेत; ते गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच शेतकऱ्यांच्या घटनेतील आहेत. २६ ऑगस्टला राजस्थान सीमेला लागून असलेल्या गावात बिबट्याने हा हल्ला केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच याच एलियनसारख्या दिसणाऱ्या प्राण्यासोबत अन्य काही फोटो जोडून ते दोन वर्षापुर्वी देखील व्हायरल झाले होते. अर्थात त्या प्राण्याचे फोटो एडीट करून वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आला अशी अफवा पसरवत आहेत; सोबत इतर अपघातांचे फोटो जोडून या प्राण्याने केलेला हल्ला म्हणून सांगितले जात आहे
हा प्राणी नेमका कुठला
एलियनसारखा दिसणारा हा प्राणी नेमका कुठे दिसला आणि कोठून आला याची उत्सुकता पोस्टमध्ये पाहिल्यानंतर अनेकांमध्ये होती. पण हा एलियनसारखा दिसणारा प्राणी हा खरा प्राणी नसून लाईरा मागनुको नावाच्या एका इटालियन कलाकाराने तयार केलेली मूर्ती आहे. सिलिकॉन रबरापासून सजीवसदृश्य विचित्र प्राण्यांच्या मूर्ती तयार करण्यात त्यांची हातोटी आहे. लाईरा मागानुको यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या या कलाकृतींचे शेकडो फोटो पाहण्यास मिळतात. Laira Maganuco 'गुगल'वर सर्च केले की हे सर्व दिसते. जे फोटो व्हायरल होत आहेत ते काही खऱ्या प्राण्याचे नाहीत. ते फोटो लाईरा मागानुको यांच्या कलाकृतींचे आहेत.
@Esakal
शेर करा सर्व मित्रांना
Don't be afraid..the animal roaming in the field is not an alien
Jalgaon: A fake post about a strange animal found in a field in Vellane village in Dhule district is currently going viral in Khandesh. It is being forwarded without any confirmation. Some posts also say that this alien type animal is entering the field from the Gujarat border. As such posts are going viral on social media, there is an atmosphere of fear among the farmers. However, no such animal has been found in Dhule district.
Looking at the photo, I feel scared
Photos of the alleged animal, which has a human-like face, sharp claws and a tail like a fist, are being shared. Apart from this, photos of the farmers who were injured in the incident are also being shared. At the same time, the farmers are being appealed not to go to the field alone. As a result, fear has spread among farmers. Actually this is a totally false post. It is clear that someone did this.
Injured farmer from Gujarat
The fake post contains photos of injured men and women; He is one of five farmers injured in a leopard attack in Gujarat's Banaskantha district. Sources said that the leopard attacked the village on August 26 near the Rajasthan border. It also went viral two years ago by adding some other photos with the same alien-looking creature. Of course, rumors are circulating that the animal was found in different places by editing photos; Attaching photos of other accidents is said to be an attack by this animal
What exactly is this animal?
Many were curious as to where exactly this alien-looking creature appeared and where it came from after seeing it in the post. But this alien-looking creature is not a real creature, but an idol created by an Italian artist named Lyra Magnuko. He has a knack for creating sculptures of living creatures from silicone rubber. Hundreds of photos of her works can be seen on Laira Maganuko's Facebook page. A search on Google by Laira Maganuco shows that. The photos that are going viral are not of some real animals. Those photos are by Laira Maganuko.
टिप्पणी पोस्ट करा