दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी Detective activity of Dinkar Kadam [Love Diary]





दिनकर कदम अकरावीमध्ये होता त्यावेळची गोष्ट. खूप वर्षांपूर्वीची. त्याकाळी कॉम्प्यूटर नव्हते. मोबाईल फोन नव्हते. मुले-मुली एकमेकांशी डायरेक्ट किंवा चिट्ठी, पत्र लिहून संपर्क साधत असत. [Love Diary]


दिनकर वर्गाचा मॉनीटर होता. एके दिवशी मधल्या सुट्टीत त्याच्याच वर्गातली एक मुलगी, जाई त्याला म्हणाली, ‘माझं तुझ्याकडे जरा काम आहे. शाळा सुटल्यावर भेटणार का?’

‘काय काम आहे?’ त्याने जरा तिरसटपणेच विचारले. तो मुलींपासून दूरच रहात असे, आणि एखादी मुलगी जवळ यायला बघत असेल तर तिच्याशी तिरसट बोलून तिला पळवून लावत असे.

‘एक प्रॉब्लेम आहे..’ ती मुलगी म्हणाली.

‘कसला प्रॉब्लेम आहे? गणितातला?’

‘नाही, वेगळा प्रॉब्लेम आहे. आत्ता नाही सांगू शकत. प्लीज मला शाळा सुटल्यावर भेट’ असे म्हणताना तिच्या डोळ्यात आसवे आली.


हे कांहीतरी वेगळे प्रकरण आहे हे दिनकरच्या लगेच लक्षात आले. तो म्हणाला, ‘चल, आपण बाहेर कुठेतरी लगेच बोलू. नाहीतरी जाधव सर आज आलेले नाहीत, पुढचा तास ऑफच आहे’ {Love Story}


मग ते दोघे शाळेपासून थोडे लांब असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले. एका कोप-यातल्या टेबलावर बसले. मग तिने तिच्या एका वहीत ठेवलेली एक चिट्ठी बाहेर काढली. दिनकरला दिली.  {Love Story}

दिनकर ती चिट्ठी वाचू लागला.


‘प्रिय जाई,

तू मला फार आवडतेस. तू माझ्याशी मैत्री करशील का? मी तुला फुलासारखे जपेन. प्लीज नाही म्हणू नकोस. नाही म्हणालीस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव......{Love Story}

तुझाच

ओळख पाहू कोण?’

त्याचे वाचून झाल्यावर जाई म्हणाली, ‘ही चिट्ठी कोणी पाठवली हे शोधून काढायचे आहे’.


ती चिट्ठी टाईप केलेली होती. चिट्ठीमध्ये पाठवणा-याचे नाव, सही वगैरे कांही नव्हते. तारीखही नव्हती. दिनकरने विचारले, ‘ही चिट्ठी तुझ्यापर्यंत आली कशी?’

‘पोस्टाने’, जाई म्हणाली, ‘पोस्टमनने आणून दिली’

‘याच्यावरचे पाकीट कुठाय?’ दिनकरने विचारले.

जाईने तिच्या वहीतून एक पाकीट काढून दिनकरपुढे केले.  त्या पाकीटावरचा जाईचा पत्ता हा देखील टाईप केलेला होता. पाकिटावर दोन शिक्के होते, एक पुढच्या बाजूस आणि दुसरा मागच्या बाजूस. दोन्ही शिक्के एकाच पोस्टाचे होते.{Love Story}


Credit  Unknown