मुलगा मुलीला म्हणाला बावळट, आणि मग काय घडले...



 लग्नाची सर्व तयारी झाली मात्र वधूने अचानक लग्नाला नकार दिल्याने नवरदेव तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी नियोजित वधूच्या व तिच्या वडिलांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातल्या घंगाळदरे येथील कृष्णा केशव तळपे (वय 55) यांचा मुलगा भरत (वय 26) याने पुण्याजवळील भोसरी येथील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

भरतचे जानेवारी 2020 मध्ये जुन्नर तालुक्यातीलच एका मुलीबरोबर लग्न ठरले होते. फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजूंच्या पाहुण्यांनी बैठकीत 2 मे लग्नाची तारीख ठरवली पण दरम्यान लॉकडाउनमुळे ठरलेल्या तारखेला लग्न होऊ शकले नाही.


नवरी मुलीची कंपनी सुरू झाल्याने भरत मुलीला भोसरीला सोडून पुन्हा गावी आला. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर संवाद झाला. त्यात 'दोन दिवस तू फोन का केला नाहीस?' असे विचारल्यावरून भांडणे सुरू झाली. त्यावरून मुलीने कारणही दिलं की, 'मला लग्न करायचंच नाही'.

त्यानंतर ती गावी आली त्यावेळी तिच्या घरी जाऊन तिने लग्नाला का नकार दिला असं तिच्या वडिलांसमोर विचारले. त्यावर तिने, 'भरत, मला बावळट व बिनअकली आहेस असं म्हणाला. हा जर आता तसे बोलतो तर लग्नानंतर काय करेल?' त्यामुळे मला त्याच्यासोबत लग्न करायचेच नाही असं तिने सांगितलं.

त्यानंतर 28 जुलै रोजी वधूचा मामा आणि वडिलांनी तिला भोसरीला सोडले. वधूने भरतला फोन करून बोलवून घेतले होते. 31 जुलै रोजी भरत ने त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. गळफास घेऊन चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात "आई-बाबा तुम्ही खचून जाऊ नका. मला त्या मुलीने दिलेल्या त्रासामुळे जगण्याचा कंटाळा आलाय" असे लिहिल्याचे समजते.

भरतला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे भरतच्या वडिलांनी आरोप केले असून तशी तक्रार पोलिसात दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.