💥 राज्यातील 6 जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा - Extreme levels of rainfall expected in 6 districts of the state



💥 राज्यातील 6 जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा


⚡ येत्या 24 तासांत राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


💁‍♂️ हवामान विभागाची माहिती : आज 22 सप्टेंबरला रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्गातही अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


⛈️ मुसळधार : पुणे, कोल्हापूर व सातारा येथे आजचा दिवस अति मुसळधार पावसाचा असणार आहे. शिवाय पालघर, मुंबई, ठाणे येथे आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.


💫 रिमझिम : राज्यातील इतर जिल्ह्यातही कमी-जास्त प्रमाणात पावसाची रिमझिम सुरू असणार आहे.


👀 येत्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.


📌 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. 


Extreme levels of rainfall expected in 6 districts of the state

The state has been given a red alert in the next 24 hours and the meteorological department has forecast torrential rains in several districts, including the Konkan.

 Meteorological Department Information: A red alert has been issued to Raigad, Sindhudurg, Ratnagiri, Pune, Satara and Kolhapur districts on September 22. Extreme levels of rainfall are also expected in Sindhudurg.

Heavy rains: Heavy rains are expected in Pune, Kolhapur and Satara today. Besides, torrential rains with thunderstorms have been warned at Palghar, Mumbai and Thane today.

Rimjim: Rimjim rains will continue in other districts of the state.

The Colaba Observatory has forecast torrential rains in South Konkan, Goa and parts of Mumbai and Thane in the next 24 hours.

The monsoon has reactivated across the state, including Pune, due to the formation of a low pressure area in the Bay of Bengal.