📱 WhatsApp चे नवीन 'रुम' फिचर लवकरच लाँच
💫 WhatsApp वर लवकरच एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार 'रूम' फिचर लाँच करणार आहे.
👉 रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास 50 WhatsApp आणि WhatsApp वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत.
⚡ सध्या WhatsApp यावर काम करत असून लवकरच रूम फिचरसह पुढील काळात WhatsApp अनेक फिचर लाँच करणार आहे.
💁♂️ मल्टि डिव्हाईस फिचर :
▪️ या फिचरच्या माध्यमातून युझर्स एक अकाऊंट चार वेगवेगळ्या मोबाईलमधून चालवू शकता.
▪️ डाटा सिंक करण्यासाठी वाय-फायचा वापर करावा लागणार आहे. या फिचरचा खुलासा वेब बीटा इंफोने केला.
💁♂️ एक्सपायरिंग मेसेज फिचर :
▪️ या फिचरमध्ये WhatsApp अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.197.4 वर स्पॉट केले आहे.
▪️ युझर्स या फिचरच्या माध्यमातून सात दिवसानंतर सेंड केलेले मेसेज ऑटो डिलिट करु शकतात.
💁♂️ व्हिडीओ कॉल बटन :
▪️ या बटनच्या माध्यमातून युझर्स सहज ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल करु शकणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
टिप्पणी पोस्ट करा