👨‍💼 प्रोफेशनल होण्यासाठी आवश्यक गोष्टी


ऑफिसमध्ये आपल्या कामाची जबाबदारी समजून घेऊन ती योग्यप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला कि, कौतुक होतेच. मात्र काही गोष्टी आवडत नसतील तरीही ऑफिसचे नियम तोडण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यानुसार काम करण्याची तयारी ठेवा. 


ऑफिसमधील खेळीमेळीचे वातावरण तुम्हाला अजून काम करण्यासाठी किंवा क्वालिटी वर्क देण्यासाठी गरजेचे असते. तरीही जॉब आपले प्रोफेशन आहे हे लक्षात ठेवून तुम्ही प्रोफेशनल व्हायलाच हवे. प्रोफेशनल होण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत ते बघूया... 


●  तुमच्या सहकार्‍यांशी संबंध कसेही असोत; पण सगळ्यांशी हसून खेळून वागा. 


●  तुमचे डेली रिपोर्टस किंवा मंथली रिपोर्ट व्यवस्थितपणे आणि वेळेत देत जा. 


● ऑफिसमध्ये तुम्ही खरं बोला आणि स्पष्ट बोला. खरं बोलतानाही समोरच्याचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. 


● कामात जर तुमच्याकडून काही चूक झाली तरी स्वत:ची चूक मान्य करा. 


● काम करताना तुमचे व्यक्तिगत रागद्वेष दूर ठेवा. 


● ऑफिसमध्ये खेळकर वातावरण राखणे सर्वांचीच जबाबदारी असते, याचे भान असू द्या. 


● ऑफिस गॉसिप्स करू नका आणि त्यात भाग घेऊ नका. 


● ऑफिसमधील राजकारणापासून दुर रहा. आपले काम काटेकोर आणि चोखपणे पार पाडा. 


● सहकार्‍यांशी बोलताना शक्यतो एकमेकांना कळेल एवढ्याच आवाजात बोला. फोनवर किंवा मोबाईलवर बोलताना तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या. 


● तुमचे मेल्स, डॉक्युमेंट्स, टेलिफोन्स हे शक्यतो ऑफिशियल मॅटरसाठी वापरावेत. 


● ऑफिसमध्ये कामविषयी चर्चा करायची असल्यास त्या व्यक्तीशी किंवा मॅनेजमेंटशी व्यक्तीश: जाऊन भेटा आणि बोला. 


● तुम्हाला दिलेले काम वेळेत पूर्ण करा. विलंब होत असल्यास त्याची पूर्वसूचना संबंधित अधिकार्‍याला द्या. 


● खाद्यपदार्थ ऑफिसमध्ये आणणं शक्यतो टाळा आणि ऑफिसचा परिसर स्वच्छ ठेवा. अशा प्रकारे हे वर्क एथिक्स पाळल्यास तुमचे ऑफिसमध्ये काम करणे हे आनंदायी आणि उत्साहवर्धक होते...