✈️ 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात


VIVO S1 PRO 17999

⚡ केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी (7 ऑगस्ट ) भीषण अपघात झाला. 


😥 या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 


👀 याच पार्श्वभूमीवर आपण भारतातील मोठ्या विमान अपघाताविषयी जाणून घेऊ


● 7 जुलै 1962 : एलिटालिया फ्लाइट 777 मुंबईत पहाडी भागात धडकले. 94 जणांचा मृत्यू


● 28 जुलै 1963 : यूएईच्या विमानाचा मुंबईत अपघात; 63 ठार


● 14 जून 1972 : जपान एअरलाइन्सचे विमान दिल्लीत विमानतळावर कोसळले; 85 जणांचा मृत्यू


● 31 मे 1973 : दिल्ली विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले; 48 जणांचा मृत्यू


● 12 ऑक्टोबर 1976 : मुंबईत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला आग, 95 मृत्युमुखी


● 1 जानेवारी 1978 : एअर इंडियाचे विमान मुंबईत बांद्रा किनाऱ्यालगत कोसळले; 231 जणांचा मृत्यू


● 19 ऑक्टोबर 1988 : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला अहमदाबादेत अपघात, 133 जण ठार 


● 14 फेब्रुवारी 1990 : इंडियन एअरलाइन्सचे विमान बंगळुरुत कोसळले; 92 जणांचा मृत्यू


● 16 जुलै 1991 : इंफाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. सर्व 69 प्रवाशांचा मृत्यू


● 26 एप्रिल 1993 : इंडियन एअरलाइन्सचे विमान औरंगाबादमध्ये रनवेवरच ट्रकला धडकले. 55 जण ठार 


● 12 नोव्हेंबर 1996 : सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाची कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाशी हवेत धडक़ 349 लोकांचा मृत्यू


● 17 जुलै 2000 : पाटण्यात एअरलाइन्स विमानाला अपघात, 60 ठार 


● 22 मे 2010 : एअर इंडिया एक्सप्रेस विमान बेंगरूळ एअरपोर्टवर कोसळले; 158 प्रवाशांचा मृत्यू