💫 संजय गांधी निराधार योजना


⚡ शासनाच्यावतीने राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे.


🧐 योजनांसाठी अटी: 

▪किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

▪वय- 65 वर्षांपेक्षा कमी

▪कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 21,000/- पर्यंत


📄 आवश्यक कागदपत्रे:

▪वयाचा दाखला

▪रहिवासी दाखला

▪उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.

▪अपंगत्व/ सिव्हील सर्जन/ सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला


💁‍♂ लाभाचे स्वरूप

✅ लाभार्त्यांस दरमहा रुपये 600/- अनुदान 

✅ एका कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह अनुदान


🏢 संपर्क साधण्याचे ठिकाण: 

● अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय.

● तहसीलदार कार्यालय.

● तलाठी कार्यालय.


📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)