💥 आता ट्विटरवर नो कॉपी पेस्ट



💫 ट्विटरने कॉपी पेस्ट होणारे ट्विट हाइड करण्याचा निर्णय घेतला आहे. 


✨ जर कोणाचे ट्विट कॉपी करून ते पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेकजण करत असतील, तर ते ट्विट लोकांच्या टाइमलाइनवरून हाइड केले जाणार आहेत. [No copy paste on Twitter]


⚡ ट्विटरकडून या संदर्भात ट्विट करून सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉपी-पेस्ट 'copypasta' वाल्या ट्वटिच्या संख्येत मोठी वाढ झाली झाल्याचे  ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.


📌 दरम्यान, एकाच ट्विटला अनेकजण कॉपी करून ट्विट करत आहेत. अशावेळी अशा ट्विटची व्हिजिबिलीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. [No copy paste on Twitter]