कोरफड ही औषधी वनस्पती भरपूर फायदे ते आज जाणून घेऊ..

 

कोरफड ही औषधी वनस्पती! तिचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे आहेत. त्याचबरोबर त्याचे अन्य फायदे आहेत. ते आज जाणून घेऊ.. 


1. शीत गुणधर्म : कोरफडीचा रस हा गुणधर्माने शीत असतो. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंथा शांत राहते. आपल्या शरीरातील दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. 


2. सांध्यांच्या दुखण्यासाठी : ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे असते त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस मात करतो.


3. कोलेस्ट्रॉलसाठी मदत : कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते. 


4. वजन नियंत्रित ठेवते : कोरफडीचा रसाचे रोजच्या सेवनाने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते .


5. मुख शुद्धी : कोरफडीच्या सेवनाने तोंडाची स्वच्छता राखली जाते. त्यामुळे घश्याच्या आजारापासून मुक्ती मिळते.


6. मधुमेहावर उपयोगी : तुम्ही जर कोरफडीचा रस रोज सेवन केला तर, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. 


7. डोळ्यांचे सौंदर्य वाढवते : ग्लासभर पाणी आणि कोरफडीच्या रसाने सकाळी डोळे स्वच्छ धुतल्यास स्वच्छ व निरोगी होतात. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.