👨‍💼 आजघडीला नोकरीसाठी आवश्यक गोष्टी...


कोरोनाची परिस्थिती पाहता कुठे कर्मचारी कपातीचे तर कुठे पगार कपातीचे धोरण अवलंबिले जात आहे. अशात आपली आहेत ती नोकरी टिकविणे आणि नवीन नोवरी मिळविणे मोठे आव्हान होऊन बसले आहे. म्हणून आज आपण याचा मुद्यांवर थोडा विचार करणार आहोत...   


● सध्या जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल आपल्या कामाबाबत इमानदार असणे गरजेचे आहे.


● अनेकजण काम  करतात पण त्याबाबत त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ज्याप्रकारे तुम्ही काम करता ते सांगता येणंही  महत्वाचं असतं. 


● जर तुमच्या कंपनीची प्रगती होईल तर तुमचीही प्रगती होईल. म्हणून बेस्ट देण्याचा प्रयत्न करा.


● सध्या एकाच पोस्टवर असताना अनेक काम करावी लागत आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळी कामं यायलाच हवीत. नसल्यास ती शिकून घेण्याची तयारी असावी. 


● नेहमी सकारात्मक विचार ठेवा. डिजीटल मीडियाशी नाते घट्ट करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. 


● काळानुसार स्वतःला बदला. तसेच तुम्ही जे काही करणार आहात त्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.


● नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर प्रोफाईल अपडेट करत रहा. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते.