👌 कारले कडू पण आरोग्यासाठी गोड


कारले कडू असले तरी शरीराच्या आरोग्यासाठी मात्र त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन 'अ', 'क' भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कारल्याचा आहारात आवर्जून समावेश करायलाच हवा. आज त्याचे फायदे पाहुयात... 


● नियमित कारले खाल्याने त्वचा चमकदार होते. तसेच काही स्किन इनफेक्‍शनही दूर होतात. 


● यात रक्‍त शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ज्यांना पिंपल्सचा वारंवार त्रास होत आहे त्यांनी कारले अवश्य खावे.


● याचा रस प्यायल्याने सोरायसिस किंवा काही फंगल इनफेक्‍शन असल्यास ते कमी होते.


● यात व्हिटॅमिन 'सी' असल्याने त्वचेवर असणाऱ्या रिंकल्स कमी करण्यास फायदेशीर आहे. 


● यामध्ये हिपोटिक गुण असल्याने हे लिव्हरच्या आजारांवर अत्यंत गुणकारी आहे. 


● हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पूरक आहे.


● हे शरीरातील टॉक्‍सिन्स कमी करते. 


● ज्यांना टाईप 1 आणि टाईप2 डायबेटीज आहे. अशांसाठी कारल्याचा ज्युस उपयुक्‍त आहे.


● बॉडी स्टॅमिना व एनर्जीसाठी नियमित कारले खा 


● यात भरपूर फायबर असल्याने कॉन्स्टिपॅशन अपचनाचा त्रासाला कमी होतो.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED  घेत नाही.