💥 कोविड रुग्णालयाचे सोमवारी लोकार्पण [AMBAJOGAI BATMYA]
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचे सोमवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता लोकार्पण होणार आहे.[AMBAJOGAI BATMYA]
जिल्ह्यात वाढलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजेन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. [AMBAJOGAI BATMYA]
वाढत्या रुग्ण संख्येमुळे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे सर्व सोयीसुविधा युक्त, प्रशस्त व अद्ययावत रुग्णालय अत्यंत कमी वेळेत जिल्हा आरोग्य विभागाने उभे केले आहे.
या रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार असून या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या शिरसाट, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, [Beed News Batmya]
आ. नमिता मुंदडा, आ. बाळासाहेब आजबे, आ. विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ. संजय दौंड, आ. विक्रम काळे, आ. संदीप क्षीरसागर, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी आदी उपस्थित असणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा