😇 अचानक नोकरी गेली तर काय कराल?


कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. नोकरदार वर्गात तर कमालीची दहशत पसरली आहे. आपल्या नोकरीचे काय होईल? या चिंतेने त्यांचा जीव सदैव टांगणीला लागला आहे.

कित्येकांचे जॉब अगोदरच गेले आहेत. अशात जर आपलाही जॉब गेला तर काय? प्रश्न नकारात्मक वाटत असला तरी सद्यस्थितीत पुढे काय होईल? याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. म्हणूनच जॉब गेल्यावर काय करायला हवे? याबाबत थोडा विचार करूयात..

● नजीकच्या काळात आपला जॉब जाणार हे नक्की असेल, तर हातातला जॉब न सोडता दुसऱ्या चांगल्या जॉबचा शोध घ्यावा.

● कितीही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, तर संयम न सोडता किंवा धीर न घालवता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा.

● योग्य आर्थिक नियोजन करून केवळ आवश्यक खर्चालाच प्राधान्य देऊन पैसे वाचवण्यावर भर द्यायला हवा.

● महिन्याचे उत्पन्न आणि आवश्यक खर्च लक्षात घेऊन आकस्मिक निधी तयार करायला हवा. अचानक जॉब गेला तर तो निधी कामी येईल.

● जर दर महिन्याला कर्जाचे हफ्ते देत असाल तर त्यात खंड पडायला नको. कारण कर्जाचे हफ्ते न देणे हा त्यावरचा उपाय नाही, हे लक्षात घ्या.

● जॉब गेल्यावर अनेकजण गोंधळून स्वत:जवळची गुंतवणूक रिअल इस्टेट किंवा इक्कीटिज विकण्याची घाई करतात. जे कदम चुकीचे आहे.

● अस्थिर परिस्थितीवर मात करण्यासाठी कधीही छोट्या फायद्यासाठी स्वत:ची बोली लावू नका. याचा तुमच्या क्षमतेवर परिणाम होईल.