😷 म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका


■ सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे.

■ या मास्कचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की, श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो  व बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो.

■ या मास्कच्या व्हॉल्वमधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्कमुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग होईल.

■ पण समोरच्या बाधित व्यक्तीलाही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहीत नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर,  अशा संसर्गित व्यक्तीपासून इतरांचे संरक्षण होणार नाही.

■ मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वत:चेच रक्षण नव्हे तर इतरांनाही आपल्यापासून संसर्ग होऊ नये, हा आहे. त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. शासनानेही या मास्कवर बंदी घालावी.

■ मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते.

■ खाणी व खोदकामात, बोगद्यात काम करणाºया कर्मचाºयांचा श्वास गुदमरू नये यासाठी मास्कमध्ये व्हॉल्वची योजना आहे.

■ मोकळ््या जागेत व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची, जीव गुदमरण्याची भीती नाही. व्हॉल्वमधून कोरना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.