🗣️ संभाषण चातुर्य असे वाढवा...!
एखादा व्यक्ती छान बोलत असली कि त्याचं बोलणं ऐकतच रहावसं वाटतं. त्याची स्टाईल, शैली पाहून असं वाटतं असं संभाषण मला करता आलं तर. येईल तुम्हाला पण नक्की येईल त्यासाठी काही ठराविक नियम आणि तत्त्वे फॉलो करणे गरजेचे असते. ते पुढीलप्रमाणे...
● तुम्ही जेव्हा नवीन व्यक्तींना भेटता, तेव्हा आपणसामान्यपणे त्यांचा चेहरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी त्या व्यक्तीचे नाव लक्षात ठेवा.
● संभाषण करत असताना समोरच्या व्यक्तीचे नाव वारंवार घ्यावे. ऑनलाईन चॅटींग करतानाही ही पद्धत फॉलो करा.
● तुम्ही त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्यास समोरच्यावर, आपण त्यांना महत्त्व देत आहोत, असे इंप्रेशन पडेल. यामुळे समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्याशी संभाषण करण्याला महत्त्व देईल.
● तुम्हाला उत्तम श्रोते व्हावे लागेल यामुळे तुम्ही संभाषणात चतुर व्हाल.
● अनेकजण संभाषणात स्वत:बद्दल बोलण्यालाच महत्त्व देतात. तेव्हा असे न करता, समोरच्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकून घ्या.
● तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली तर त्याबद्दल शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास नेहमी उत्सुक राहा.
● अधिक माहिती घेण्याच्या हेतूने तुम्ही अधिक प्रश्न विचारल्यास तुमच्यामधील संभाषण आणखी वाढेल.
● तुमचा प्रश्न विचारण्याचा सुर चौकशी केल्यासारखा नसावा पण, तुम्हाला खरंच माहिती हवी आहे. हे समोरच्याच्या लक्षात आले पाहिजे.
● तुमच्याजवळ जास्त वेळ असेल तर तुम्हाला अधिक माहिती असणाऱ्या विषयांवरही तुम्ही संभाषण करू शकता. समोरची व्यक्तीसुद्धा ते ऐकण्यात इंटरेस्ट घेईल आणि त्यांचे त्याविषयीचे अनुभवही शेअर करेल.
टिप्पणी पोस्ट करा