👉 भेसळ कशी ओळखाल How to recognize adulteration



तिखट Red chilli

तिखटात विटांची बारीक पावडर मिसळली जाते. त्यामध्ये कुत्रीम रंग ही मिसळलेला असतो.

चाचणी Test

तिखटात पाणी टाकून ठेवा तिखट वरील बाजूला आल्यास शुद्ध आणि बुडाला साचून राहिले ते भेसळ युक्त आहे.

हळद  Turmeric

हळदीत मेतनील येलो नावाचे रसायन मिसळले जाते यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो.

चाचणी Test 

हायड्रोक्लोरिक ॲसिड काही थेंब आणि तेवढेच पाणी हळदीत टाका जर हळदीचा रंग गुलाबी किंवा जभाळ झाला तर समजा हळद भेसळ  युक्त आहे.

दालचिनी Cinnamon

दालचिनी मध्ये पेरूच्या झाडाच्या साली मिसळल्या जातात.

चाचणी Test 

दालचिनी हातावर रगडून पहा जर तिचा मूळ दालचिनीचा रंगासारखा छान दिसला नाही तर ती मिसळीत आहे.

काळी मिरी Black pepper

पपईच्या बियांना काळा रंग देऊन भेसळ केली जाते यामुळे काळीमिरीच वजन वाढतं.

चाचणी Test 

काळीमिरीत पाणी किंवा दारू टाका जर वर तरंगत राहिली तर अशुद्ध आणि बुडाली तर शुद्ध आहे.

हिरवे मटार Green peas

हिरवे मटर मोड रंगापेक्षा जास्त हिरवेगार व्हावेत याकरिता त्यामध्ये मेला फ्राईड ग्रीन मिसळले जाते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

 चाचणी Test 

काही वेळासाठी पाण्यात ठेवा पाणी हिरव्या रंगाचे झाल्यास मटारमध्ये भेसळ झाली आहे असे समजा.

खवा 

दुधासारखी खव्यात ही भेसळ होते

चाचणी Test

खवा टेस्ट ट्युब मध्ये भरून त्यात पाणी टाकून ऊकळवा गार झाल्यावर त्यात दोन थेंब Iodine टाका जर खवा निळा पडला तर त्यामध्ये स्टार्च मिसळलेले आहे.

 दूध  Milk

दुधात पाणी मिसळणे अगदी सामान्य आहे.

 चाचणी Test 

गुळगुळीत फरशीवर दुधाचे काही थेंब टाका जर थेंब पुढे पाहिले तर त्यात पाणी मिसळलेले आहे.

 जर दूध शुद्ध असेल तर ते हळूहळू आणि पांढरे डाग पडतील.

 तांदूळ Rice

प्लास्टिक किंवा बटाट्यापासून तयार केलेले अशुद्ध तांदळाचे भेसळ केलेले असते हे तांदूळ पचनासाठी कठीण असल्यामुळे पोटाचा विकार होण्याची शक्यता असते.

चाचणी Tesr 

भात शिजवताना लक्ष द्या त्यातून वेगळ्या प्रकारचा सुगंध ही येतो.

सफरचंद Apple 

 सफरचंदावर मेणाचा थर चढवला जातो त्यामुळे सफरचंदावर चमक
 येते.

चाचणी Test 

चाकू द्वारे ओरख कडून पाहिल्यावर मेणाचा थर सहज लक्षात येतो.