'मिशन झिरो औरंगाबाद'
भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद कोरोनामुक्त करून मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी "मिशन झिरो- औरंगाबाद" या उपक्रमाचे लोकार्पण आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार सुभाष देसाई, आरोग्यमंत्री मा.ना.राजेश टोपे, आ.संजयजी शिरसाट, आ.प्रदीपजी जैस्वाल, मा.आ.कैलास पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, भारतीय जैन संघटनेचे गौतम संचेती, पारस बागरेचा, प्रवीण पारख, पारस चोरडिया, किशोर ललवाणी आदींची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. दुपारी ते राजकीय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा