🎯 करिअर : मरीन इंजिनीअरिंग


अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त जहाजे, पाणबुड्या आणि सर्व सुविधासंपन्न बंदरे यासारख्या बाबींचा वापर मरीन इंजिनीअरिंमध्ये होतो. थोडक्यात सांगायचे तर जगभरात सुरु असणारे मोठे व्यापार मुखतः समुद्रीमार्गे सुरु असतात. यामागे मरीन इंजिनीअरिंगचे फार मोठे योगदान आहे. आज या करिअर क्षेत्रा बाबाबत बारकाईने माहिती पाहुयात...

💁‍♂️ मरीन इंजिनीअर बनण्यासाठी :

● 12वी विज्ञान विषयात 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● देशभरातील शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये मरीन इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
● या मान्यताप्राप्त संंस्थेतून मरीन इंजिनीअरिंग विषयात बॅचलर डिग्री अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
● यानंतर उमेदवांची मुलाखत आणि सायकोमेट्रिक टेस्ट घेऊन त्यांना प्रवेश दिला जातो.
● या क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यास उमेदवारांना चिकित्सा परीक्षेतून जावे लागते.

🤓 आवश्यक कौशल्ये:

● जहाजातील मशीनचे उत्कृष्ट ज्ञान असावे.
● समुद्रात विपरीत परिस्थितीत काम करण्याची क्षमता असावी.
● कुटुंबापासून दूर राहून सतत नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत कार्य शेवटास नेण्याची क्षमता असावी.

📝 उपलब्ध अभ्यासक्रम :

1. बीटेक इन मरीन इंजिनीअरिंग.
2. बीटेक इन नेव्हल आर्किटेक्ट अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअरिंग.
3. डिप्लोमा इन मरीन इंजिनीअरिंग

🎯 रोजगाराच्या संधी :

1. मरीन इंजिनीअरिंग आणि नेव्हल आर्किटेक्ट याव्यतिरिक्त तो साईट मॅनेजर, शिप बिल्डर, मेटल वर्कर आणि कार्बन फायबर टेक्निशियन पदावरही काम करू शकतो.
2. पारंपरिक कामात शीप डिझाईन क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढत आहे.
3. तेल कंपन्यांना त्याच्या कामासाठी मरीन इंजिनीअरिंग उमेदवारांची आवश्यकता असते.

💸 वेतन किती? :

● या क्षेत्रात वेतन कार्यपद्धती आणि पदानुसार दिले जाते.
● सामान्यपणे प्रोफेशनल्सला 64 हजार ते 96 हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाते.