💥 रुग्णांचा रिकव्हरी रेट 63 तर मृत्यूदर 2.72 टक्के


💫 देशभरात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 65 टक्के तर मृत्यूदर 2.72 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

✨ तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कितीने वाढत आहे याकडे अधिक लक्ष दिले जात असून त्या संदर्भातील चाचणी व उपचार करणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

⚡ देशभरात मागील 24 तासांत 26,506 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर पडली असून 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

👉 त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर पोहचला आहे. त्यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

📍 तर 2,76,685 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

📌 दरम्यान देशात एकूण 21,604 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.