💥 पुण्यात टेकडीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या
पुण्यातल्या डुक्कर खिंडीमध्ये एका महिलेने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिला मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या पतीने दारूच्या व्यवसनातून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आशा सोमनाथ रनसिंग (वय 35, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशा रणसिंग यांचे मुळगाव बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. त्या अनेक दिवसांपासून पतीसह बालेवाडी भागात राहत होत्या. स्वतः धुनी-भांडी करत. तर पती मिळेल ते काम करत होते. त्यांचे पती सोमनाथ यांना दारूचे व्यसन होते.
त्या व्यसनात त्यांनी दहा दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर आशा या तणावाखाली होत्या. या डिप्रेशनमध्ये त्या रविवारी (दि.21) रोजी सकाळी चालत चालत डुक्कर खिंड येथील डोंगरावर आल्या आणि त्यांनी तेथून उडी मारून आत्महत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याकडे मिळालेल्या फोटोच्या आधारे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, त्यांच्या वडिलांचा शोध लागला. त्यानंतर या महिलेची ओळख पटली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा