🤓 तरुण उद्योजकांसाठी उपयुक्त टिप्स


हल्ली नोकरीपेक्षा व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढला आहे. मात्र हा निर्णय घेणे जितके सोपे आहे. त्यापेक्षा जास्त जोखमीचे आहे. त्यामुळे अशा वेळी काय करावे? ते पाहुयात...      

1. तुमचे उत्पादन सर्वोत्तम असेल यावर लक्ष दया.

2. तुमच्या कामगारांची योग्य ती काळजी घ्या. जेणे करुन त्यांचा कामातला सहभाग वाढेल.

3. तुमचे उत्पादन नक्की कोणासाठी आहे? हे ठरवा. कारण त्यावरून तुमचा ग्राहक वर्ग नक्की होईल.

4. तुमच्या उत्पादनासाठी योग्य ती मार्केटिंग स्ट्रॅटिजीज निवडा.

5. तुमच्या उत्पादनाचा दर्जा कायम उत्तम ठेवा.

6. व्यवसायामधील छोट्या-छोट्या गोष्टी कडे लक्ष दया.

7. तुमचा उत्पादन खर्च आणि त्याची विक्री किंमत याचा योग्य समतोल राखा.

8. तुमचे उत्पादन योग्य आहे की नाही? सर्वाना आवडते की नाही? याचा सर्व्हे करत रहा.

9. भविष्यात तुमचे उत्पादन एक ब्रँड कसे होईल? याकडे लक्ष द्या.

10. तुमच्या उत्पादनाविषयी नेहमी सकारत्मक विचार करा. अपयश आले तरी खचून जाऊ नका.