🤳 सर्वोत्कृष्ट सेल्फी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स!


मौसम कोणताही असो सेल्फीची क्रेझ काही कमी होत नाही. मात्र अनेकांना सेल्फी घेण्याचे योग्य तंत्र जमत नाही. अशा लोकांसाठी सर्वोत्कृष्ट सेल्फी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स घेऊन आलो आहोत... 

● सेल्फी घेताना खुल्या जागेत किंवा भरपूर लाईट्स असणार्‍या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सेल्फीसाठी पुरेसा प्रकाश असणे गरजेचे आहे.

● नेहमी सेल्फी घेताना स्क्रीनकडे पाहण्याऐवजी फ्रंन्ट कॅमेर्‍याकडे पहा.

● सेल्फी घेण्याची सर्वोत्कृष्ट वेळ म्हणजे सुर्योदय किंवा सुर्यास्त होताना.

● सेल्फी घेताना फोन थोड्या तिरक्या किंवा वरच्या दिशेने पकडा. तसेच चेहर्‍याचा कोनही बदला.

● सेल्फी घेताना तुमचा चेहरा आणि फोन यामध्ये शक्य तितकं अंतर ठेवा.

● सेल्फीत हसायचंच असेल तर नैसर्गीकरित्या हसा. कारण कृत्रिम हसू ओळखून येतं.

● सेल्फी क्लिक करताना स्मार्टफोनच्या स्क्रिन वरील बटनाऐवजी वॉल्युम बटन्सचा वापर करा. ज्यामुळे फोन नीट पकडणे शक्य होते. सेल्फी स्टीक वापरली तर बेस्टच.

● सेल्फी काढताना नेहमी बर्स्ट मोडचा वापर करा. यामुळे एकाच क्लिकमध्ये भरपूर फोटो कॅप्चर होतात.

● सेल्फीमध्ये चांगल्या बॅकग्राऊंडचाही विचार करा.

● सेल्फी फोटोला कमीत-कमी एडीट करा. फिल्टर्स आणि स्टिकर्सचा भरमसाठ वापर करणे टाळा.