🤓 ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी फायदेशीर टिप्स


सध्याची परिस्थिती पाहता ऑनलाईन इंटरव्ह्यू आता काळाची गरज बनणार असल्याचे चित्र आहे. अशात या इंटरव्ह्यूसाठी काय तयारी केली पाहिजे? याबाबत पाहुयात... 

1) अभ्यास करा : कोणताही इंटरव्ह्यू देण्याआधी प्रथम त्या कंपनीचा अभ्यास करा. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे? ते पद किती महत्त्वाचे आहे? त्या पदाकडून कंपनीच्या अपेक्षा काय? याचा अभ्यास करा. याचा तुम्हाला फायदा होईल.

2) सराव करा : प्रत्यक्ष ऑनलाईन इंटरव्ह्यू होण्याआधी त्या इंटरव्ह्यूचा सराव करा. तुम्ही कसे प्रेझेंट व्हाल? याची एक झलक तुम्हाला मिळेल. तुमचे सॉफ्टवेअर (झूम, स्काइप, फेसटाइम इत्यादी) नीट काम करतंय ना आणि तुम्हाला ते नीट हाताळता येतंय ना हे पाहून घ्या.

3) योग्य जागा निवडा : ऑनलाईन इंटरव्ह्यू देण्यासाठी जागा अतिशय नियोजनबद्ध रीतीने निवडा. त्या जागी खूप अंधार नको आणि ओव्हरहेड लाईट्सही नकोत.नैसर्गिक प्रकाश येईल अशा जागेची निवड करा.

4) योग्य पेहराव : ऑनलाइन इंटरव्ह्यू देत आहात, म्हणून तुम्ही कसेही कपडे घालणार असाल किंवा कॅज्युअल वेअर प्रेफर करणार असाल तर ते बिल्कुल चालणार नाही. हा जॉब इंटरव्ह्यू आहे त्यामुळे तो तुम्ही गांभीर्यानेच घ्यायला हवा. डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही योग्य पेहराव केलेला असायलाच हवा.

5) नीट ऐका आणि सुस्पष्ट बोला : तुमचा आवाज मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट ऐकू येत आहे का? याची खात्री करून घ्या.वेळ घ्या आणि शंकांचे बोलून निरसन करून घ्या.

6) देहबोली नीट ठेवा : आत्मविश्वासपूर्ण देहबोलीतून तुम्ही मुलाखतकारावर चांगला प्रभाव पाडू शकता. तुमचे हात तुमच्या मांडीवर ठेवा, जेणेकरून लक्ष विचलित करणारे हातवारे होणार नाहीत.