🥛 नासलेल्या दुधाचा स्वयंपाकात करा असा उपयोग


🥛 दूध नासल्यानंतर किंवा फाटल्यानंतर त्यातून पाणी आणि घन पदार्थ वेगळे करतात. याच घन पदार्थांपासून पनीर, चीन बनतं.

पण त्या उरलेल्या पाण्याचाही वापर काही गोष्टींसाठी करता येतो हे तुम्हाला माहित आहे का? नासलेल्या दुधातील पाणी अनेकजण फेकून देतात. पण विविध कारणांसाठी ते वापरलं जाऊ शकतं.

🍛 पीठ मळण्यासाठी

सर्वसाधारपणे आपण पीठ मळण्यासाठी साधं पाणी वापरतो. पण साधं पाणी वापरण्याऐवजी तुम्ही नासलेल्या दुधाचं पाणी वापरू शकता. या पाण्यामुळे चपात्या आणखी मऊ होतात.

🥗 भाज्या शिजवण्यासाठी

एखादी भाजी शिजवताना त्यात साधं पाणी टाकण्याऐवजी तुम्ही नासलेल्या दुधाचं पाणी टाकू शकता. यामुळे अन्नपदार्थ अधिक पौष्टिक होण्यास मदत होते. तुम्ही डाळ शिजवण्यासाठीही हे पाणी वापरू शकता. यामुळे अन्नाला आणखी चव येते.

🍜 भात शिजवण्यासाठी

जास्त प्रमाणात दुध नासलं असेल आणि त्यातून पाणीसुद्धा अधिक शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही भात शिजवताना ते पाणी वापरू शकता.

जर हे पाणी पुरेसं नसेल तर त्यात तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरु शकता. यामुळे भात चविष्ट आणि पौष्टिक बनतो. केवळ भातच नाही तर न्यूडल्स शिजवतानाही तुम्ही नासलेल्या दुधाचं पाणी वापरु शकता.