👨‍💼 इंटरव्ह्यूसाठी वापरा 'हा' ड्रेस कोड!


इंटरव्ह्यूला जायचे म्हटले कि, एक आपसूकच धास्ती निर्माण होते. अशात गोंधळाच्या नादात काहीतरी कपडे घालून निघतो. मात्र केवळ ड्रेसिंग स्टाईलमुळे आपल्याला एखाद्या कंपनीनं नाकारू नये, असे वाटत असेल तर खालील काही टिप्स तुम्हाला मदतगार ठरतील...

1. ड्रेसची निवड : तुम्ही कोणत्या इंडस्ट्री/ प्रोफाईलसाठी मुलाखात देत आहात? हे सर्वप्रथम लक्षात घ्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जाताना शक्यतो निळा, ग्रे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. तसेच फॉर्मल ड्रेसमुळे तुमचे चांगले इम्प्रेशन पडेल.

2. हेअर स्टाईल : हेअर स्टाईलवर विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कारण तुमचे केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. मुलींनी शक्यतो केस मोकळे सोडावेत किंवा सिंपल पोनी टेल बांधावा. मुलांनी मुलाखातीसाठी जाताना क्लिन आणि हेअर स्टाईल सिंपल ठेवावी.

3. लाईट मेकअप : विशेषतः मुलींनी जास्त गडद मेकअप करू नये. यामुळे तुमचे इंप्रेशन खराब होऊ शकते. अत्यंत साधा आणि लाईट मेकअप करा. हातात घड्याळ असावे. मुलाखातीसाठी जाताना बॅग जास्त मोठी किंवा फॅन्सी नसावी.