🌱 उडीद लागवड


⚡ खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके घेतली जातात. उडीद ही 70 ते 75 दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील फायदा घेऊ शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी ही दोन्ही पिके महत्त्वाची आहेत.

💁‍♂️ जमीन : मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.

🧐 मशागत : उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळावच्या पाळ्या मारुन सपाट करावी. याच वेळी हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत घालावे.

👀 उडदाच्या सुधारित जाती : 

1) बीडीयू : 1 : दाणे मध्यम ते काळ्या रंगाचे व टपोरे, कालावधी 70 ते 75 दिवस, उत्पादन 11-12 क्विं/हे

2) टीएयु : 1 : कालावधी 70 ते 75 दिवस, भूरी रोगास प्रतिकारक, उत्पादन 10-12 क्विं./हे

3) टीपीयु : 4 : कालावधी 65 ते 70 दिवस, उत्पादन 10 ते 11 क्विं/हे

4) टीएयु : 2 : कालावधी 70 ते 75 दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन 10-12 क्विं/हे

⛈️ पेरणीचा काळ : पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान करा. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते.

👉 बीजप्रक्रिया : हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बाविस्टीन 1 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकांचे नुकसान होत नाही. 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पीएसबी प्रति 250 ग्रॅम लावून पेरणी करा.

🗣️ खतांची मात्रा जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरवा. पेरणीवेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी.

📌 आंतरमशागत : पेरणीनंतर सुरुवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व दोन कोळपण्या करा.


सर्व शेतकर्याना शेर करा