15 ऑगस्ट रोजी त्याठिकाणी पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.


 माजलगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाथरूड या गावाला धार्मिक दृष्ट्या संवेदनशीलतेचा मोठा इतिहास आहे.या गावात 1992 मध्ये दंगल झाली होती,त्यावेळी बीड पोलिसचे ASI साहेबराव बाबर हे शहीद झाले होते.असे असले तरी पाथरूड या गावाने सन 2019-20 वर्षांमध्ये अयोध्या प्रकरण निकाल,राम मंदिर भूमिपूजन, तसेच विविध संवेदनशील विषयां दरम्यान सामाजिक सलोखा टिकवून ठेवला आहे.तसेच वृद्धिंगत केला आहे. यामुळेच यागावाची निवड करून पोलीस अधीक्षक यांनी विशेष प्रयत्नातून पोलीस सहकार्यतून या गावालगत असलेल्या 'घळती' नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करून जलसंधारणाचे कार्य झाले. या पाणी संवर्धनाच्या कामाचा गावकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. दि.15 ऑगस्ट रोजी त्याठिकाणी पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.