🤓 पावसाळा आणि घरातील दुर्गंधी दूर करण्याच्या टिप्स


पावसाळ्यात वातावरणात असणारी आर्द्रता आणि कोंदटपणा दुर्गंधीचे कारण बनते. या दुर्गंधीमुळे अशा ठिकाणी थांबणे नको-नको वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने घरातील दुर्गंधी झटकन दूर होईल.
Tips for removing rain and household odors
1. पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी टाळण्यासाठी एका कपात कॉफी ठेवून हा कप कपाटात ठेवा. यामुळे कपड्यांची दुर्गंधी दूर होईल.

2. दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड पाण्यात मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून जेथे दुर्गंधी आहे त्या ठिकाणी स्प्रे करा.

3. केवळ व्हिनेगार तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरुन नॅचरल रुम फ्रेशनर म्हणून वापरु शकता.

4. या काळात रुम फ्रेशनर म्हणून एकदा कापूरचा वापर करुन पाहा. यामुळे घरात ताजेपणा राहतो. तसेच दुर्गंधी दूर होईल.

5. लेमन ग्रास आणि लॅव्हेंडरचे तेल पाण्यात मिसळून रुम फ्रेशनच्या रुपात तुम्ही वापर करु शकता.

6. संत्र कापून त्यातील गर काढून मोकळ्या जागेत मीठ भरून खोलीत ठेवा.

7. बल्बवर थोडंसं सुगंधी तेल शिंपडा, उष्णतेने त्याचा सुवास सर्वत्र पसरेल.

8. टॉयलेट किंवा बाथरूममध्ये शॅम्पूच्या रिकाम्या बाटलीत पाणी घालून ते टाकल्यास दुर्गंधी दूर होईल.