💥 बीड जिल्हा रुग्णालयात विद्यार्थिनीची छेडछाड


बीड बातम्या : जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या मुलीची छेड काढली.मुलीने गुरुवारी या प्रकरणाची रीतसर तक्रार जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केली होती.डॉ.आय व्ही शिंदे,डॉ. राम देशपांडे आणि प्राचार्यां सुवर्ण बेद्रे यांची त्रिसदसीय समिती तयार करून या प्रकरणाचा अहवाल २४ तासांमध्ये सादर करण्यास डॉ.अशोक थोरात यांनी सांगितलं होत.
 [Student molested at Beed district hospital]
या त्रिसदस्यीय समिती कडून शुक्रवारी अहवाल येत असतानाच मुलीच्या नातेवाईकांनी आदित्य महाविद्यालयात येऊन छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्यास चोप द्यायला सुरवात केली. कर्मचाऱ्यामध्ये आणि नातेवाईका मध्ये चांगलीच हाणमार सुरु झाली असतात इतर कर्मचार्यांनी हि हाणमार सोडवली.या दोघांमधील वादादरम्यान रुग्णालयातील टेबल, खुर्च्यांची व इतर साहित्यांचे नुकसान झाले असून रुग्णालय मध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले होते.दोघांनी घातलेल्या वादामुळे आणि रुग्णालयातील झालेल्या नुकसानीमुळे दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिले आहे.