🌱 सोयाबीन : खत व्यवस्थापन Soybean: Fertilizer management


⭐भरखते - चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी २ टन पेरणीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर जमिनीत मिसळावे.

⭐वरखते - सोयाबीन पिकास प्रति एकरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ३० किलो स्फुरद (१८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १८ पालाश (३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून किंवा चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावीत.

🌱 राज्यातील जमिनींमध्ये गंधक, लोह, जस्त व बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. जेथे माती परिक्षण झाले नाही, अशा ठिकाणी दोन ते तीन वर्षांतून एकदा गंधक (८ किलो/एकर), झिंक सल्फेट (८ किलो/एकर), फेरस सल्फेट (८ ते १० किलो/एकर) आणि बोरॅक्स (२ किलो/एकर) पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

🌱 माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते आणि सम्राट प्लस/सम्राट ए.एफ./अंकुश/संग्राम/प्रिन्स/सुदर्शन/स्फूर्ती ४५/सुपर पॉवर/सोना प्लस/संग्राम लिक्वीड सिलिकॉन/संग्राम ड्रीप/सोया बंपर ह्या जैविक औषधांच्या वेळोवेळी फवारण्या कराव्यात ज्यामुळे उत्पादनात २५% ते ५०% वाढ होते!