💅 ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!


सुंदर दिसण्यासाठी बाजारात विविध कंपन्यांचे ब्युटी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र ते खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता... 

Remember these 'things' before buying beauty products!
1. सर्वप्रथम कॉस्मेटिक मधील इनग्रेडिएंट्स कोणते आहेत? ते तपासून घ्या. कारण त्यामध्ये असणारे काही रासायनिक पदार्थ असतात त्वचेसाठी धोकादायक ठरु शकतात. त्याबाबत  विचार करा.

2. ब्युटी प्रॉडक्ट्स ऑनलाईन पद्धतीने घेताना त्याबाबत रिव्हू नक्की वाचा. त्यावरून तुम्ही घेत असलेले प्रॉडक्ट्स योग्य आहे की नाही? हे कळेल.

3. तुमची त्वचा कोरडी, ऑयली की नॉर्मल स्वरुपाची आहे? ते माहित करून घ्या. याची ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करताना मदत होते. 

4. तुमच्या त्वचेचा रंग, स्किन टोन काय आहे हे सुद्धा जाणून घ्या.

5. प्रॉडक्ट्सवरील पॅकिंग आणि एक्सपायरि डेट काय आहे? हे आर्वजून पहा.