👀 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे
⚡ गरजू दिव्यांगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने पुरविणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल पुरविण्याची राज्यशासनाची योजना आहे.
🧐 योजनेच्या प्रमुख अटी :
• विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.• लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दरमहा 1500 रुपयांपेक्षा कमी असावे.(1501 ते 2000 रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना साधनाची 50 टक्के रक्कम भरावी लागेल.)
• अर्जदाराचे दिव्यंगत्व किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
📄 आवश्यक कागदपत्रे :
• विहित नमुन्यातील अर्ज• दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र
• उत्पन्नाचा दाखला
🤔 लाभाचे स्वरूप असे :
✔ अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल.मूकबधिर असणाऱ्यांना श्रवण यंत्रे.
✔ अंध व्यक्तींना चष्मे, पांढरी काठी आदी 3000 रुपयांपर्यंतचे साहित्य दिले जाते.
🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
टिप्पणी पोस्ट करा