💥 शेतकर्‍यांना पीककर्ज द्या; माकपचे आंदोलन


👉 लॉकडाऊनच्या काळात मजुरांसह शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या पेरणीचा हंगाम असल्याने बी-बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही.

👉 त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीचे सर्व कर्ज माफ करून तात्काळ नवीन पीक कर्ज द्यावा, अशी मागणी माकपने करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

👉 माकपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करून तात्काळ नवीन पीक कर्ज वाटप करावे.

👉 इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा 7500 रुपये रोख द्यावे, सहा महिने दरडोई 10 किलो धान्य मोफत द्यावे.

👉 मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान दोनशे दिवस रोजगार द्यावा, बेरोजगारांना तात्काळ बेरोजगार भत्ता जाहीर करावा.

👉 शेतकर्‍यांचा पीक विमा टेंडर कंपनीने घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी माकपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

👉 यावेळी माकपचे मोहन जाधव, प्रा. मारुती वाघमारे, सुहास जायभाये, प्रा.कुंडलिक खेत्री, राम शेळके, दत्ता सौंदरमल आदींची उपस्थिती होती.