🌱 मूग लागवड


⚡ मूग हे पिके विशेषतः खरिपात घेतात, मात्र सिंचन सुविधा व सुधारित जाती यामुळे उन्हाळ्यातही या या पिकांची लागवड करण्यास सुरवात केली आहे. ही पीके उष्ण हवामानात चांगले येतात. साधारणपणे 21 ते 35 अंश से. तापमानात या पिकांची चांगली वाढ होते. 600 ते 700 मि.लि. पाऊसमान असलेल्या भागात उत्पादन भरपूर मिळते.

💁🏻‍♂️ जमीन : मध्यम ते भारी जमिनीत मूग-उडीद चांगला येतो. जमीन चांगली निचऱ्याची असावी. जमीन सेंद्रिय घटकांचे प्रमाण बऱ्यापैकी असावे.

🧐 मशागत : अगोदरच्या हंगामातील पीक निघाल्यानंतर वखराच्या साह्याने जमीन भुसभुसीत करा. जमीन भुसभुसित नसल्यास या पिकांच्या मुळाची वाढ व्यवस्थित होत नाही, व पर्यायाने मुळावरील गाठींची संख्या सुध्दा कमी होते. अगोदर एकरी 4-6 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळून द्यावे व नंतर एक कुळवाची पाळी द्यावी.

👉🏻 वाण : मूग : वैभव, फुले एम- 2

👀 बियाणे प्रमाण :

प्रतिहेक्टरी 12 ते 15 किलो.
सुधारित व प्रमाणित बियाण्यांची निवड करा.
स्वत:जवळचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे. घरचेच बियाणे वापरावयाचे असल्यास चाळणी करून एकसारखे बियाणे वापरावे. बियाण्यांची उगवणक्षमता पेरणीअगोदर तपासून घ्या.

🌤️ पेरणी : ओळीत 30 सें. मी. अंतर ठेवावे. सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असणाऱ्या जमिनीत आंतरमशागतीच्या सोयीनुसार 37.5 किंवा 45 सें. मी.पर्यंत अंतर वाढवा.
बियाणे योग्य खोलीवर पेरावे. उथळ पेरल्यास ओल न मिळाल्यास बियाणे उगवणार नाही. जास्त खोल पेरल्यास बियाण्यांचा अंकुर जमिनीच्या वर येण्यास वेळ लागेल किंवा वर येणार नाही.
बियाणे 5 ते 6 सें. मी. खोलीवर पेरावे.

💫 खत : प्रतिहेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळा.
या पिकाला नत्रापेक्षा स्फुरदाची जास्त आवश्यकता आहे. तरी सुरवातीच्या काळात पीक जोमदारपणे वाढण्याच्या दृष्टीने प्रतिहेक्टरी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद ही खतमात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. नत्र व स्फुरद एकाच वेळी पेरणीच्या वेळेस जमिनीत बियाण्यांच्या खाली पेरून द्यावे.